'जाने जान' चित्रपटाचे शीर्षक गीत रिलीज झालं आहे. या गाण्यात करीना कपूर आणि विजय वर्मा एकत्र दिसत आहेत. नेहा कक्करने या गाण्याला तिचा आवाज दिला आहे. हे गाणे लता मंगेशकर यांनी गायलेल्या 1969 मध्ये आलेल्या 'इंतकाम' चित्रपटातील "जाने जान" या गाण्याचा रिमेक आहे.