‘कोड नेम तिरंगा’चा ट्रेलर रिलीज, परिणीती चोप्रा-हार्डी संधू जबरदस्त दिसले भूमिकेत

परिणीती चोप्रा आणि पंजाबी गायक-अभिनेता हार्डी संधू त्यांच्या आगामी 'कोड नेम तिरंगा' या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. हा चित्रपट 14 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी 'कोड नेम तिरंगा' शी संबंधित पोस्टर, टीझर रिलीज केल्यानंतर आता चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज केला आहे. 'कोड नेम तिरंगा'चा ट्रेलर मंगळवारी रिलीज होणार होता पण आता काही कारणांमुळे ट्रेलर रिलीज पुढे ढकलण्यात आला आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.