लॉकडाऊनमधील परिस्थिती लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रियल रील्स प्रस्तुत, राजेश गुप्ता (Rajesh Gupta) निर्मित,दिग्दर्शित ‘अनलॉक जिंदगी’(Unlock Zindagi Trailer) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ट्रेलरमधील पहिलाच सीन काळजाचा ठोका चुकवणारा आहे. यात एक स्वार्थी व्यावसायिक, फ्रँटलाईन वर्कर,त्याची काळजी करणारी बायको, गृहिणी, दोन परिस्थितीमुळे त्रासलेल्या स्त्रिया यांची कहाणी पाहायला मिळणार आहे. या सगळ्यांचे आयुष्य समांतर जात असतानाच प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत. ट्रेलरमध्ये माणुसकीचा खरा चेहरा समोर आणणारी अनेक दृश्ये यात दिसत आहेत. कठीण प्रसंगात रक्ताची नाती कशी मागे फिरतात आणि अनोळखी कसे मदत करतात, याचे दर्शनही यातून होत आहे. येत्या 19 मे रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पितोबाश त्रिपाठी, राजेश गुप्ता, देविका दफ्तरदार, शिवानी सुर्वे, इंदिरा कृष्णा, हेमल देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘अनलॉक जिंदगी’चं लेखन आणि संवाद राजेश गुप्ता यांचे असून गीतकार नुसरत फतेही अली खान, राजेश गुप्ता आहेत.