रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनिलियाच्या (Genelia Deshmukh) ‘वेड’ या चित्रपटाचा टीझर (Ved Teaser) रिलीज झाला आहे. तब्बल २० वर्ष अभिनय क्षेत्रातील कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वेड’ या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. तसेच विशेष बाब म्हणजे या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. हा चित्रपट ३० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.