अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलीया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या ‘वेड’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. आता या चित्रपटातील गाण्याचा टीझर शेअर करण्यात आला आहे. ‘वेड तुझा विरह वणवा’ (Ved Tujha Song Teaser) असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं २९ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या गाण्याची झलक टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. या टीझरमध्ये रितेश अभिनेत्री जिया शंकरबरोबर रोमान्स करताना दिसत आहे. अजय-अतुलच्या आवाजातील हे गाणं खरंच मंत्रमुग्ध करणारं आहे.