भाऊ कदम(Bhau Kadam) व कुशल बद्रिकेची(Kushal Badrike) मुख्य भूमिका असलेल्या ‘पांडू’(Pandu)चित्रपटाची सध्या खूप चर्चा सुरु आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. आता  ‘पांडू’ चित्रपटाचा ट्रेलर (Pandu Trailer Release) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘पांडू’ चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला प्रवीण तरडे एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना हसू अनावर होईल. सोनाली कुलकर्णीनेही(Sonalee Kulkarni) अनेकांची मने जिंकली आहेत. सध्या हा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत आहे.