स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर हे गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या राहत्या घरी अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. यावेळी त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आईने भेट दिली असता तूपकरांची प्रकृती पाहून या मातेने अक्षरशः हंबरडा फोडला, आणि आपला लेक शेतकऱ्यांसाठी लढतोय त्यामुळे त्याची सरकारने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा त्याच्या जीवाला जर काही बरे वाईट झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर असेल असा संतप्त इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला आहे.