गेल्या काही दिवसांमध्ये चीन आणि इतर काही देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.या कोरोनाच्या लाटेबाबत डॉ. रवी गोडसे म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट वगैरे भारतात आली नव्हती. तिसरी लाट आली नसल्याने चौथी लाट येण्याचा प्रश्नच नाही. कोरोनाची चौथी लाट वगैरे भारतात येणार नाही. त्यामुळे आपण सध्या जे काम करतोय ते सुरू ठेवलं पाहिजे. तसेच निर्बंध उठवून जे काही सुरू केलंय ते योग्यच आहे, असं मत डॉक्टर रवी गोडसे यांनी मांडले.