भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी शिवसेना संपण्याच्या मार्गावर असल्याचं विधान केलं आहे. त्यावर उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी भाष्य केले आहे. राजकारणात विजय आणि पराभव होत असतो. पण आता संपवण्याची भाषा केली जात आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. अनेक आव्हानं पायदळी तुडवत आम्ही झेंडा रोवला आहे असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाला सांगायचं आहे की, तुम्ही गुलाब पाहिलं असेल आता काटे बघा आणि हे काटे तुम्हाला टोचल्याशिवाय राहणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.