अयोध्येमध्ये राम मंदिर बांधणाऱ्या विचारांचे सरकार पंढरपुरातील अहिल्यादेवी होळकरांचे राम मंदिर पाडत आहे. ही गोष्ट दुर्दैवी आहे. पंढरपूरमध्ये कॉरिडॉर करत असताना कुठल्याही मंदिर अथवा व्यावसायिकांच्या जागेला धक्का न लावता विकास करावा. होळकर शाहीचा कळवळा असणारे आमदार गोपीचंद पडळकर हे होळकर वाड्याबाबत शांत आहेत. मंगळसूत्र चोरणाऱ्यांकडून काही अपेक्षा नाही, असा टोला माजी आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी लगावला.