
मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक अभिनेता असलेल्या विकास पाटीलला (Vikas Patil) आता त्याचे चाहते एका वेगळ्याच भूमिकेत पाहणार आहे. ‘विश्वनायक’ (Vishwanayak Hindi Drama) या हिंदी महानाट्यात तो स्वामी विवेकानंद यांची भूमिका करणार आहे. विकास पाटीलचे हे खास फोटो पाहून चाहते खूश झाले आहेत.

विश्वनायक स्वामी विवेकानंद यांची भूमिका साकारण्याची संधी मला लाभली हे माझं मोठं भाग्य आहे. आतापर्यंत अनेक भूमिका केल्या पण हिंदी रंगमंचावर इतक्या मोठ्या महामानवाची व्यक्तीरेखा लोकांसमोर सादर करणं माझ्यासाठी मोठं आव्हानात्मक आहे, पण तितकीच अभिमानाची गोष्ट देखील आहे, असं विकास पाटीलनं म्हटलं आहे.

गंधार प्रोडक्शन निर्मित ‘विश्वनायक’ या हिंदी महानाटकाचे दिग्दर्शन प्रां मंदार टिल्लू यांचे असून शिरीष लाटकर यांचे लेखन आहे. तसेच श्रद्धा सचिन मोरे यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

विशेष म्हणजे, या हिंदी नाटकात ठाण्याचे आमदार संजय केळकर रामकृष्ण परमहंस यांच्या व्यक्तीरेखेत दिसणार आहेत.

सतीश आगाशे, नीलपरी खानवलकर, राजू आठवले, सुकन्या काळण, मकरंद पाध्ये या मराठी कलाकारांचा देखील या नाटकामध्ये सहभाग आहे.
