चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) यांचा नवा चित्रपट ‘फुरसत’चा ट्रेलर (Fursat Trailer) रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये ईशान खट्टर (ishaan Khattar)आणि वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये स्पष्ट दिसतंय की यावेळी प्रेक्षकांना वेगळ्या संकल्पनेवर आधारित सिनेमा बघायला मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण चित्रपटाचं शूटींग आयफोन 14 प्रोवर करण्यात आलं आहे. ट्रेलरमध्ये दिसतंय की ईशान खट्टरकडे असं काहीतरी तंत्रज्ञान आहे ज्यामुळे तो भविष्यात काय घडणार हे बघू शकतो. भविष्यावर ताबा मिळवण्याचा त्याचा प्रयत्न सुरु आहे.