ganesh idol in final stage

मुंबईतील(Mumbai) लालबाग, परळ, चिंचपोकळी, भायखळा, आदी भागात गणपतींच्या कारखान्यात आणि चित्रशाळेत गणपतींवर शेवटचा हात(Artists Giving Final Touch To Ganesh Idols) फिरवला जात आहे.

    मुंबई : चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे दैवत म्हणजे गणपती(Ganapati Festival 2021). सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा गणशोत्सावाची(Ganeshotsav 2021) जय्यत तयारी झाली आहे. पुढील आठवड्यात लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील(Mumbai) लालबाग, परळ, चिंचपोकळी, भायखळा, आदी भागात गणपतींच्या कारखान्यात आणि चित्रशाळेत गणपतींवर शेवटचा हात(Artists Giving Final Touch To Ganesh Idols) फिरवला जात आहे. तर काही ठिकाणी लाडक्या बाप्पांच्या सुबक मूर्ती साकारल्या गेल्या आहेत. या उत्सवासाठी पालिकेनेसुद्धा जोरदार तयारी केली आहे. दादर, गिरगाव, जुहू यासह सर्व विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांकडून नियोजन अंतिम टप्प्यात आले असल्याचे मुंबई पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

    साचेबद्ध आकृत्यांमधून बाप्पाची मूर्ती तयार केल्या जात असून, रंगरंगोटीचे काम अंतिम टप्पात आले आहे. बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. पुढील आठवड्यात १० तारखेला बाप्पाचे आगमन होत आहे. त्यामुळे अनेक गणपती कारखान्यांमध्ये दिवस-रात्र कामगार काम करत आहेत. मुंबईतील अनेक चित्रशाळेत बाप्पांच्या सुबक आणि आकर्षक मूर्ती बुकिंगसाठी ठेवण्यात आल्या आहेत. बुकिंग केलेले गणपती वेळेत देण्यासाठी गणपती कारखान्यांमध्ये रंगरंगोटीच्या कामांची लगबग सुरु आहे. सार्वजनिक गणपती मंडळ तसेच घरगुती गणपती या दोन्हींच्या मूर्तीचे काम पुढील तीन ते चार दिवसांत पूर्ण होईल असं लालबाग येथील गणपतीच्या कारखान्यातील काम करणाऱ्या कामगारांनी सांगितले.

    कोरोनाच्या संकटामुळे यंदाही सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींची उंचीची मर्यादा चार फुटांची ठेवण्यात आली असून, घरगुती गणपतीची मूर्ती दोन फुटांची ठेवण्यात आली आहे. यासोबत नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे, यासह विविध प्रकारच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. मुंबईत गिरगाव, दादर, माहीम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, मालाड मार्वे या सहा प्रमुख ठिकाणांसह ८४ मोठी विसर्जन स्थळे आहेत. दरम्यान, गणेशोत्सव आणि करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सणासुदीचे काळात कोरोना नियमांची पायमल्ली होणार नाही, याची काळजी राज्य सरकारने घ्यावी असं केंद्राने म्हटले आहे.