ganpati

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मूर्तीची पूजा(Ganesh Pujan) करण्याची परंपरा आपल्याकडे आहे.(Ganeshotsav 2021) हा सण आजकाल संपूर्ण देशभरासह अन्य देशातही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त(Ganpati Pranpratishtha Muhurt) जाणून घेऊयात.

    महाराष्ट्रात(Maharashtra) गणेशोत्सवाला(Ganeshotsav) खूप महत्त्व आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मूर्तीची पूजा(Ganesh Pujan) करण्याची परंपरा आपल्याकडे आहे.(Ganeshotsav 2021) हा सण आजकाल संपूर्ण देशभरासह अन्य देशातही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. गणपतीचा जन्म गणेश चतुर्थीच्या दिवशी झाल्याचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अन् दु:ख दूर होते, अशी भक्तांची धारणा आहे. यावर्षी १० सप्टेंबरला आपला बाप्पा येतोय. बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त(Ganpati Pranpratishtha Muhurt) जाणून घेऊयात.

    मुहूर्त – भाद्रपद चतुर्थी प्रारंभ : शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी १२ वाजून १८ मिनिटे
    भाद्रपद चतुर्थी समाप्ती : शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी ९ वाजून ५७ मिनिटे
    गणेश प्रतिष्ठापना शुभ मुहूर्त : सकाळी ११ वाजून ०३ मिनिटांपासून ते १३ वाजून ३३ मिनिटांपर्यंत.

    प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी लागणारे साहित्य – गणपतीची स्थापना करण्यासाठी चौरंग किंवा पाट आणि आजुबाजूला मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्यासाठी नारळ, आंब्यांचे डहाळे, सुपाऱ्या, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्री, ताम्हण, समई, अक्षता, वस्त्र, जानवे, अष्टगंध, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ.