gauri agman

भाद्रपद शुक्ल पक्षामध्ये चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना ज्येष्ठागौरींचे आगमन(Gauri Avahan 2021) होते. चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना पूजन(Gauri Pujan 2021) करतात आणि चंद्र मूळ नक्षत्रात असताना ज्येष्ठागौरींचे विसर्जन करतात.

    प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला सर्वप्रथम गणपतीची(Ganeshotsav 2021) पूजा केली जाते. प्रथम गणेशाची पूजा केल्यानंतर इतर देव-देवतांची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीला(Ganesh Chaturthi 2021) गणपतीची स्थापना केल्यानंतर वेध लागतात ते गौरीच्या आगमनाचे. भाद्रपद शुक्ल पक्षामध्ये चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना ज्येष्ठागौरींचे आगमन(Gauri Avahan 2021) होते. चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना पूजन(Gauri Pujan 2021) करतात आणि चंद्र मूळ नक्षत्रात असताना ज्येष्ठागौरींचे विसर्जन करतात.

    ज्येष्ठागौरीची पूजा म्हणजे खरेतर ही निसर्गाची पूजा असते. ज्येष्ठागौरी म्हणजे आदिशक्ती- पार्वतीची-गणेशमातेचीच पूजा असते. गौरीपूजनाच्या दिवशी सासरी गेलेल्या मुलीला माहेरी बोलावून तिला गोड जेवण देऊन ओटी भरतात. गौरीला परंपरेप्रमाणे खास जेवणाचा नैवेद्य करतात. काही ठिकाणी अनेक भाज्यांचा नैवेद्य देवीला अर्पण करतात. गौरीपूजनाच्या दिवशी सायंकाळी महिलासाठी हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला जातो. त्यावेळी महिला खास खेळही खेळतात. ज्येष्ठागौरींचा हा सण महिलांसाठी खूप आनंदाचा आणि उत्साहाचा असतो.यावर्षी ज्येष्ठागौरींचे आवाहन आणि पूजनाचा मुहूर्त कधी आहे याची माहिती आपण पाहणार आहोत.

    मुहूर्त

    यावर्षी रविवारी १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४९ वाजता चंद्र अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी ९.४९ नंतर ज्येष्ठा गौरी आणाव्यात. तसेच सोमवारी १३ सप्टेंबर रोजी ज्येष्ठागौरी पूजन करावे. मंगळवार १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७.०४ वाजता चंद्र मूळ नक्षत्रात प्रवेश करील. त्यामुळे यादिवशी सकाळी ७. ०४ नंतर दिवसभर कधीही ज्येष्ठागौरीचे विसर्जन करावयाचे आहे.

    पूर्वी गौरीच्या उत्सवाला ‘महालक्ष्मी उत्सव’ म्हटले जाई. महालक्ष्मीने कोलापूर राक्षसाला ठार मारले आणि लोकांना सुखी केले. म्हणून हा उत्सव साजरा करण्याची प्रथा पडली. नंतर मध्यंतरीच्या काळात गौरी उत्सव व महालक्ष्मी उत्सव एकत्र साजरे होऊ लागले.काही लोक परंपरेप्रमाणे खड्याच्या गौरी आणून त्याचे पूजन करतात. तर काही मुखवट्याच्या गौरी पूजतात. काहीजण गौरींची मूर्ती तयार करून तिची पूजा करतात. काही लोक प्रथेप्रमाणे तेरडा वनस्पतीची पूजा करतात.