चाकरमान्यानू चला गावाक : गणपतीनिमित्त मुंबई गोवा महामार्गावर 8 ते 19 सप्टेंबर अवजड वाहनांना बंदी

प्रशासनाच्या निर्देशानुसार 8 ते 10 सप्टेंबर, 14 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबरला अवजड वाहनांच्या वाहतुकीला पूर्णपणे बंदी असेल. सुखकर प्रवासासाठी मुंबई – गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचा निर्णय याआधीच प्रशासनाने घेतला होता. त्यासोबत आता या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घातल्याने चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे.

    गणपतीनिमीत्त दरवर्षी हजारो चाकरमानी कोकणात आपल्या गावाला जात असतात. पण, रस्त्यातील खड्डे, गाड्यांची ट्राफीक यासह असंख्य अडचणींचा सामना करत प्रवास करावा लागतो. या चाकरमान्यांचा हाच त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना 5 दिवस बंदी घातली आहे.

    प्रशासनाच्या निर्देशानुसार 8 ते 10 सप्टेंबर, 14 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबरला अवजड वाहनांच्या वाहतुकीला पूर्णपणे बंदी असेल. सुखकर प्रवासासाठी मुंबई – गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचा निर्णय याआधीच प्रशासनाने घेतला होता. त्यासोबत आता या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घातल्याने चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे.

    मुंबई ते कोकण या प्रवासात खालापूर टोल नाका, पेण, वडखळ, आणि पुई पुलाजवळ मोठय़ा प्रमाणात खड्डे आहेत. सोबतच लांजा, बावनदी, आरवली, सावर्डे, चिपळूण, पर्शुराम घाट, लोटे, नागोठणे, इंदापूर, महाड, कशेडी घाटातही खड्डे असून चिपळूणजवळ चौपदरीकरणाचे काम अपूर्ण आहे. यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांची हाडं खिळखीळी होतात.

    दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेने या वर्षी कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. सोबतच निर्बंधही शिथिल करण्यात आल्याने कोकणात एस.टी, खासगी बस आणि चार चाकी वाहनाने येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पाच दिवस अवजड वाहनांना बंदी घातल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.