बाप्पा मोरयाच्या….. जय घोषात अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी झाले श्रींचे आगमन

बाप्पाच्या आगमनाची वर्षभर आपण सगळेच मोठ्या आतुरतेने बाप्पाची वाट पाहत असतो. ती वाट बघणे आता संपले आहे, या शब्दात स्वप्नील जोशीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    मुंबई: गणेशोत्सवाच्या आनंदमय सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे.मराठी सेलिब्रेटींच्या घरीही मोठ्या उत्साहात गणोशोत्सव साजरा केला जातो. मोठा थाटामाटातगणेशाचे आगमन केले होत आहे. प्रसिद्ध अभितेनेता स्वप्नील जोशीच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले आहे.

    ”बाप्पाच्या आगमनाची वर्षभर आपण सगळेच मोठ्या आतुरतेने बाप्पाची वाट पाहत असतो. ती वाट बघणे आता संपले आहे,” या शब्दात स्वप्नील जोशीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    दरवर्षीप्रमाणे यंदाही तेवढयाच  उत्साहात आणि आनंदात बाप्पाची या वर्षी हि स्थापना केली आहे. गेली ७१ वर्षांची परंपरा कायम राखता यंदाही बाप्पाचे घरी आगमन झाले आहे.