ganpati photo

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मूर्तीची पूजा(Ganesh Pijan) करण्याची परंपरा आपल्याकडे आहे.(Ganeshotsav 2021) हा सण आजकाल संपूर्ण देशभरासह अन्य देशातही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

    महाराष्ट्रात(Maharashtra) गणेशोत्सवाला(Ganeshotsav) खूप महत्त्व आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मूर्तीची पूजा(Ganesh Pijan) करण्याची परंपरा आपल्याकडे आहे.(Ganeshotsav 2021) हा सण आजकाल संपूर्ण देशभरासह अन्य देशातही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. गणपतीचा जन्म गणेश चतुर्थीच्या दिवशी झाल्याचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अन् दु:ख दूर होते, अशी भक्तांची धारणा आहे. यावर्षी आपला लाडका बाप्पा कधी येणार आहे ते आपण जाणून घेऊयात.

    कधी सुरु होणार गणेशोत्सव ?
    यावर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थी शुक्रवारी १० सप्टेंबर २०२१ रोजी आहे. त्यामुळे १० सप्टेंबर या दिवशीपासून यावर्षी गणेशोत्सव सुरु होणार आहे. ज्योतिषानुसार मध्यान्ह हा गणेश पूजेसाठी सर्वात योग्य काळ मानला जातो. गणेश चतुर्थी ही विविध नावांनी ओळखली जाते. काही पुराणांमध्ये ही तिथी महासिद्धिविनायकी चतुर्थी, वरद चतुर्थी या नावांनीही उल्लेखली गेली आहे. गणेशभक्तांसाठी भाद्रपद चतुर्थीला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या गणेश पूजनाचे, नामस्मरणाचे, आराधनेचे लवकर फळ मिळते, असे सांगितले जाते. यंदा १० दिवस म्हणजे १९ सप्टेंबर २०२१ अनंत चतुर्थी पर्यंत गणशोत्सव असणार आहे.

    सगळीकडे सध्या गणेशोत्सवाची तयारी सुरु झाली आहे. कोरोनामुळे या सणावर मर्यादा आली असली तरी गणेशभक्त या उत्सवासाठी खूप उत्साही आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेऊन गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.