‘राजा’ विसर्जनासाठी मार्गस्थ, पाहा लालबागच्या राज्याच्या विसर्जनाचे सर्व अपडेट एका क्लिकवर

यंदा सुद्धा लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा हा फक्त 10 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होत आहे. परंतु, पूर्णपणे लसीकरण झालेल्यांनाच यासाठी परवानगी असणार आहे. या सर्व नियमांचे पालन करत आता मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागचा राजा'चा विसर्जन सोहळा सुरु झाला आहे.

    आज अनंत चतुर्दशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. या दिवशी सर्वांचेच लक्ष लागलेलं असतं ते लालबागच्या राज्याच्या Lalbaugcha Raja 2021 विसर्जन सोहळ्याकडे. लालबागची शान असलेल्या या राजाचा विसर्जनसोहळा पाहाण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात उपस्थितीती लावतात. परंतु, कोरोनाची COVID-19 परिस्थिती पाहता अत्यंत साधेपणाने विसर्जन सोहळा गेल्या वर्षापासून पार पाडला जात आहे.

    यंदा सुद्धा लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा हा फक्त 10 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. परंतु पूर्णपणे लसीकरण झालेल्यांनाच यासाठी परवानगी असणार आहे. या सर्व नियमांचे पालन करत आता मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’चा विसर्जन सोहळा सुरु झाला आहे.

    दरम्यान लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीकडे निघाला आहे. लाडक्या लालबागच्या राजाची एक एक झलक पाहण्यासाठी आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामील होऊ नये, असं आवाहन लालबागच्या राजाच्या मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी केलं होतं.

    दुसरीकडे मुंबईचा राजा मानला जाणारा गणेशगल्लीचा बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. मुंबईचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेनं रवाना झालाय. या सोहळ्यात नागरिकांची गर्दी होऊ नये असं सतत आवाहन करण्यात येतंय.