घरी गणपती बसवणाऱ्या महिलेविरुद्ध मुस्लीम मौलवींचा फतवा

उत्तर प्रदेशमधल्या अलीगढमधल्या रोरावर परिसरातील एडीए कॉलनीत भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष रुबी आसिफ खान आपले पती आसिफ खान आणि मुलांसोबत रहातात. त्यांनी यंदा आपल्या घरी गणेश मूर्तीची स्थापना केली. रुबी आसिफ म्हणाल्या की, यंदा मी सात दिवसांच्या गणपतीची स्थापना केली आहे आणि कोणत्याही जाती-धर्मात भेदभाव मानत नाही. पूजा केल्यामुळे याआधीही आपल्याविरोधात फताव जारी होता, असे रुबी आसिफ खान यांनी सांगितले.

    लखनऊ : मुस्लीम कुटुंबाने (Muslim Family) घरी गणपतीची स्थापना (Ganesh Festival) केल्याने त्यांच्याविरुद्ध फतवा (Fatwa) जारी केला आहे. रुबी आसिफ खान (Rubi Khan) असे या महिलेचे नाव असून तिच्याविरोधात मौलवींनी (Clerics) संताप व्यक्त केला. मुस्लिमांनी फक्त अल्लाहचीच भक्ती करावी, असा दावा मौलवी मुफ्ती अरशद यांनी केला आहे.

    उत्तर प्रदेशमधल्या अलीगढमधल्या रोरावर परिसरातील एडीए कॉलनीत भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष रुबी आसिफ खान आपले पती आसिफ खान आणि मुलांसोबत रहातात. त्यांनी यंदा आपल्या घरी गणेश मूर्तीची स्थापना केली. रुबी आसिफ म्हणाल्या की, यंदा मी सात दिवसांच्या गणपतीची स्थापना केली आहे आणि कोणत्याही जाती-धर्मात भेदभाव मानत नाही. आम्ही सर्व धर्माचे सण मोठ्या उत्साहात साजरे करतो. यात आम्हाला आनंद मिळतो. पूजा केल्यामुळे याआधीही आपल्याविरोधात फताव जारी होता, असे रुबी आसिफ खान यांनी सांगितले.

    रुबी आसिफ खान यांनी हिंदू देवतांच्या पूजा केली म्हणून फतवा जारी करणाऱ्या सहारनपूरच्या मुफ्ती अर्शद फारुकी यांच्यावर टीका केली. या लोकांना देशाचे विभाजन करायचे असून असे मौलवी कधीच खरे मुस्लीम असू शकत नाहीत. ते अतिरेकी आहेत आणि जिहादी आहेत, असे रुबी आसिफ खान यांनी म्हटले आहे. या लोकांना स्वतःहून भेदभाव करायचा आहे. ते भारतात राहून भारताबद्दल बोलत नाहीत, फतवे काढणारे जिहादी लोक आहेत, जर ते खरे मुस्लीम असते तर त्यांनी अशा प्रकाराचा फतवा जारी केला नसता, असेही रुबी आसिफ खान यांनी सांगितले.