ukdiche modak recipe

बाप्पाच्या उत्सवात एक पदार्थ दरवर्षी आवर्जून केला जातो तो म्हणजे उकडीचे मोदक. या उकडीच्या मोदकाची रेसिपी(Stemed Modak Recipe) आज आपण जाणून घेऊयात.

    गणेशोत्सव(Ganeshotsav 2021) जवळ आला की एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. प्रत्येक जण आपल्या लाडक्या बाप्पासाठी यंदा काय वेगळं करता येईल याचे प्लॅन गणेश भक्त आखू लागतात. पण बाप्पाच्या या उत्सवात एक पदार्थ मात्र दरवर्षी आवर्जून केला जातो तो म्हणजे उकडीचे मोदक. या उकडीच्या मोदकाची रेसिपी(Stemed Modak Recipe) आज आपण जाणून घेऊयात.

    साहित्य : २ कप ओलं खोबरं (नारळ), १ कप गुळ, १ कप तांदुळाचे पीठ १ कप पाणी,२ चमचे तेल, १ चमचा वेलची पावडर, १/४ मीठ ( चवीनुसार ).

    सारण कृती :

    •  सर्वप्रथम कढईमध्ये किसलेला नारळ आणि चिरलेला गुळ मध्यम आचेवर सतत मिक्स करत राहा.
    •  गुळ वितळल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर घाला. आता तुमचे सारण तयार आहे.एका भांड्यामध्ये सारण थंड करा .

    उकड कृती :

    • मोठ्या आचेवर गॅसवर कढईमध्ये पाणी घाला. ते उकळल्यानंतर त्यात मीठ, २ चमचे तेल घाला. हे मिश्रण उकळू घ्या.
    • आता गॅस मध्यम आचेवर करून १ कप तांदुळाचे पीठ घाला आणि मिश्रण झाकण ठेवून १० मिनिट पर्यंत शिजवून घ्या.
    • पीठ शिजल्यानंतर नीट मिक्स करून घ्या व भांडयामध्ये काढा. हाताला तेल आणि पाणी लावून पिठीला मऊ होईपर्यंत मळून घ्यावे.

    मोदक कृती :
    आता पिठाची लहान गोळी करून पारी करुन घ्या. त्यात सारण घालून पाकळ्यांचा आकार देत देत मोदक वळून घ्या मध्यभागी सगळ्या पाकळ्यांची वरची टोके एकत्र करून मोदकाला छान आकार द्या.आता उकडीसाठी एका प्लेटमध्ये तेल लाऊन त्यावर मोदक ठेवा. इडलीचा कुकर किवां कुठल्याही भांड्या मध्ये १/५ कप पाणी टाकून मोदकाची प्लेट नीट ठेवून १० मिनिटांसाठी त्यावरती झाकण ठेवून उकडण्यासाठी ठेवून द्या.मोदक तयार.