गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबत मला सर्वांना माहिती द्यायची आहे. मी गृह विलगीकरणात आहे. मी माझे काम घरुनच करणार आहे. माला कोरोनाची लागण झाली असून कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करावी तसेच आपली काळजी घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे.

गोवा : देशात कोरोना विषाणूचे संकट आणखी बळावले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सर्वसामान्यांपासून ते गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अनेक नेत्यांनी कोरोनावर मात केली आहे. काही नेत्यांचा आणि लोकप्रतिनीधींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र आता गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करत सांगितले आहे.(Goa Chief Minister Pramod Sawant)

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबत मला सर्वांना माहिती द्यायची आहे. मी गृह विलगीकरणात आहे. मी माझे काम घरुनच करणार आहे. माला कोरोनाची लागण झाली असून कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करावी तसेच आपली काळजी घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे.

गोव्यात काल कोरोनाचे ५८८ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच एवढे रुग्ण एकाच दिवशी सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. गोव्यात आतापर्यंत १८ हजार नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर १९४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात १३ हजार ५७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.