महापालिका प्रभागांची तोडफोड केली तर प्रसंगी न्यायालयात जावू : देवेंद्र फडणवीस

राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणे म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचा अपरिपक्वपणा दिसतो, अशी टिका करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यपालांचे पत्र म्हणजे आदेश नसतो, ते कारवाई करावी अशी शिफारस करतात ही आताची परिस्थिती नाही, ही परंपरागत चालत आलेली परिस्थिती आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    पणजी :  राज्यातील सत्ताधाऱ्यांनी महापालिका निवडणुकांसाठी नवी प्रभाग रचना केली किंवा प्रभागरचना बदलली तरी मुंबईसह अन्य महानगरपालिकेत भाजपला चांगले यश मिळेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

    प्रभाग तोडफोड केल्यास न्यायालयातही जाऊ
    गोव्यात बैठकीसाठी आल्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार प्रभाग पुनर्रचना करण्याच्या नावाखाली आपल्याला हवे तसे प्रभाग तोडफोड करत आहे. त्याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला कळवले आहे, मात्र गरज पडली तर आम्ही न्यायालयातही जाऊ, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

    मुख्यमंत्री कार्यालयाचा अपरिपक्वपणा