गोव्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ हजार पार

गोव्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्येने ८,२०६ टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत ५८०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच २६४२ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. गेल्या २४ तासात ५०६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

गोवा : गोव्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. सुरुवातीलो आढळणारे कोरोनाग्रस्त हे प्रवासी होते. परंतु आता हाळू हाळू संसर्ग वाढताना दिसत आहे. गोवा राज्याच्या ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात  कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. राज्यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचा आकडा ६५० आहे. राज्यात कोरोनामुळे ७५ रुग्णांचा मृत्यू झाला. 