pramod sawant

गोव्यात ९ मे ते २३ मे या कालावधीसाठी राज्यव्यापी कर्फ्यूची घोषणा(State level curfew in Goa) करण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत(Pramod Sawant) यांनी या संदर्भात आज घोषणा केली आहे.

    देशात दररोज अनेक नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर गोव्यात ९ मे ते २३ मे या कालावधीसाठी राज्यव्यापी कर्फ्यूची घोषणा(State level curfew in Goa) करण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत(Pramod Sawant) यांनी या संदर्भात आज घोषणा केली आहे.

    कर्फ्यू कालावधीत वैद्यकीय गोष्टींचा पुरवठा सुरू राहणार आहे. याशिवाय घरगुती सामानांची दुकानं सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच रेस्टॉरंट सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत टेकअवे ऑर्डर स्वीकारू शकतील. या संदर्भात उद्या विस्तृत आदेश काढला जाईल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले आहेत.

    यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, राज्यात पॉझिटिव्हीटी रेट आणि मृत्यू दर वाढत आहे. राज्यात ऑक्सिजन व औषधांचा तुटवडा नाही. शनिवारी सायंकाळी ४ वाजता राज्यस्तरीय कर्फ्यू संदर्भात आदेश जारी केले जातील.