८ वर्षांनंतर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातून तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता

पत्रकार तरुण तेजपाल यांच्यावर आयपीसी कलम (३४२) ( चुकीच्या पद्धातीने अडवणूक ) ३४२ (चुकीचा कारावास), कलम ३५४ आत्मसन्मानाचा भंग करण्याच्या उद्देशाने हल्ला करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    पणजी: तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल (Tarun Tejpal) यांना बलात्कार प्रकरणात (Rape case) मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल आठ वर्षानंतर गोव्याच्या सत्र न्यायालयाने(Goa Sessions Court) तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली.तेजपाल यांच्यावर लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार (sexual assault) केल्याचा आरोप केला होता.

    काय होती तक्रार
    तरुण तेजपाल यांच्यावर एका महिलेने नोव्हेंबर २०१३ मध्ये गोव्याच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०१३ मध्ये याप्रकरणी तेजपाल यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तरुण तेजपाल यांना जामिन मंजूर झाला होता. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करत असलेल्या गोवा पोलिसांनी २०१४ मध्ये तरुण तेजपाल यांच्याविरोधात २,८४६ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.

    पत्रकार तरुण तेजपाल यांच्यावर आयपीसी कलम (३४२) ( चुकीच्या पद्धातीने अडवणूक ) ३४२ (चुकीचा कारावास), कलम ३५४ आत्मसन्मानाचा भंग करण्याच्या उद्देशाने हल्ला करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.