
alaska canada border earthquake
शनिवारी (०६ डिसेंबर) अलास्का, अमेरिका आणि कॅनडाच्या युकोन टेरिटरीतील सीमेजवळ हा भूकंप झाला. याची तीव्रता ७.० रिश्टर स्केल इतकी होती. या भागात कमी लोकसंख्या असल्यामुळे कोणत्याही जीवित वा वित्तहानीची घटना घडलेली नाही. अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र हे अलास्काची राजधानी जुनोपासून 230 मैल वायव्येकडे आणि युकोनच्या व्हाइटहॉर्सपासून सुमारे १५५ मैल पश्चिमेस होते.
अलास्कामध्ये झालेल्या या ७.० तीव्रतेच्या भूकंपानंतर २० पेक्षा जास्त आफ्टरशॉक जाणवले असल्याची माहिती समोर आली आहे. अलास्का भूकंप केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप या आफ्टरशॉमुळे कोणीही जखमी किंवा मृत झालेले नाही. कमी लोकवस्तीचा परिसर असल्यामुळे चिंतेचे कारण नाही. मात्र कॅनडाच्या आसपासच्या भागाता भूकंपाचे जोरदार झटके जाणवले आहे.
या भूकंपामुळे लोकांना घरातील शेल्फवरील वस्तू भिंतीवरुन पडताना पाहिले. मात्र कोणत्याही इमारतीचे नुकसान झाल्याचे चिन्ह नाही. भूकंप ६ मैल खोलवर झाला आणि त्याचे आफ्टरशॉक झाला. मात्र जोरदार हादऱ्यामुळे पश्चिम किनारपट्टी किंवा जवळच्या किनारी समुदायांना त्सुनामीचा धोका नसल्याचे राष्ट्रीय हवामान विभाग आणि पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने म्हटले आहे.
पृथ्वीच्या आत सात टेक्टनिक प्लेट्स आहेत. ज्या सतत फिरत असतात आणि एकमेकांवर आदळतात. याला फॉल्ट लाइन असे म्हणतात. प्लेट्सचे कोपरे वारंवार टक्कर झाल्यामुळे वाकतात. यामुळे जास्त दाब तयार होतो आणि घर्षण निर्माण होते. यामुळे घर्षणातून निर्माण होणारी उर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असते. जिथे जास्त प्रमाणात या प्लेट्सची हालचाली होते त्या भागात भूकंप होतात.
अलास्कामध्ये भूकंप का होतात?
अलास्का हा रिंग ऑफ फायर (Ring of Fire) म्हणजेच पॅसिफिक प्लेट आणि उत्तर अमेरिकेन प्लेटच्या सीमेजवळ अलास्का स्थित आहे. या प्लेट्स एकमेकांवर सतत आदळत असतात. ज्यामुळे घर्ष होऊन प्रचंड उर्जा बाहेर पडते. या प्लेट्सवर अलास्का स्थित असल्याने या भागात सतत भूकंप होत असतात.
Nepal Eathquake : भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरला नेपाळ; भीतीने लोकांनी घेतली घराबाहेर धाव
Ans: अलास्का आणि कॅनडाच्या युकोन टेरिटरीच्या सीमेजवळ ७.० रिश्टर स्केलचा भूकंपाचे झटके जाणवले आहेत.
Ans: अलास्का-कॅनडाच्या सीमेजवळ झालेल्या भूकंपात कोणत्याही जीवित वा वित्तहानीचे नुकसान झालेले नाही.