गोव्यात झुआरी नदीत कार कोसळली, चौघांचा मृत्यू

लोटलीहून कुठठालीमार्गे आगशीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव वेगात असलेली कार अचानक नदीच्या पुलावर येताच कार अनियंत्रित होऊन झुआरी नदीत कोसळली.

    गोवा : गोव्यात कार नदीत कोसळून अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. (Goa Accident)  वाढदिवस साजरा करून परतणाऱ्या एका कुटुंबासह त्यांच्या मित्राचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ऑस्टिन फर्नांडिस, हेनरी आरावजो, प्रिसीला क्रूझ, ऑलविन आरावजो अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

    लोटलीहून कुठठालीमार्गे आगशीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव वेगात असलेली कार अचानक नदीच्या पुलावर येताच कार अनियंत्रित होऊन झुआरी नदीत कोसळली. तब्बल अठरा तासांच्या शोधानंतर कार सापडली आहे. यात कारमधील चौघांचा ही बुडून अंत झाला आहे. यामध्ये पती, पत्नी व दिर आणि त्यांच्या मित्राचा समावेश आहे. या भीषण अपघातामुळे त्यांच्या गावावर शोककळा पसरली. हा अपघात घडल्यानंतर पोलीस (Goa Police) व अग्निशामक दलाने पहाटेपासूनच पुलावरून कोसळलेल्या त्या कारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधारामुळे व्यत्यय येत होता. गुरुवारी दुपारपर्यंत हे शोधकार्य सुरु होते.