
येत्या दोन महिन्यात काँग्रेसचे आठ आमदार दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक खुलासा नजिर खान यांनी केला. त्यांच्या समवेत अल्पसंख्याक विभागाचे साजिद खान,एलविनो अरावजो, बर्नाद फर्नाडीसही उपस्थित होते.
मुंबई : गोवा (Goa) काँग्रेस पक्षाचे नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांसह ८ आमदार भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. गोव्यातील निवडणूक (Goa Election) झाल्यापासून काँग्रेसचे आमदार दुसऱ्यांदा भाजपमध्ये जात आहेत. गोव्यातील काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याकाचा उपयोग फक्त विधानसभा निवडणुकीपूरता करून आमच्यावर अन्याय केला आहे. अशा स्वार्थी पक्षावर यापुढे विश्वास ठेवणे मुश्किल असल्याने गोवा काँग्रेस प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाबरोबर काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा (Resignation) देण्यात आला असल्याची माहिती नजिर खान यांनी दिली.
येत्या दोन महिन्यात काँग्रेसचे आठ आमदार दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक खुलासा नजिर खान यांनी केला. त्यांच्या समवेत अल्पसंख्याक विभागाचे साजिद खान, एलविनो अरावजो, बर्नाद फर्नाडीसही उपस्थित होते.
8 Congress MLAs, including former Goa CM Digambar Kamat, LoP Lobo likely to join BJP today
Read @ANI Story | https://t.co/CwvDM9On9T#Congress #Goa #BJP #CongressMLAs #GoaCongress #DigambarKamat pic.twitter.com/BurIcoPDwS
— ANI Digital (@ani_digital) September 14, 2022
राज्यातील जनतेने काँग्रेसचे अकरा आमदार निवडून दिले असतानाही पक्षातील आठ आमदार दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा खुलासा खान यांनी पत्रकार परिषदेत केला. यामुळे भविष्यात काँग्रेस पक्ष रसातळाला पोहचणार आहे. गोव्यातील काँग्रेस पक्षाच्या नेत्याने स्वार्थासाठी, या पक्षाचा फक्त आर्थिकरित्या उपयोग केला असल्याने केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी यावर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी नजिर खान यांनी केली आहे.