luizino falero

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मोठे नेते असलेल्या लुईझिन्हो (Luizinho Faleiro Resigns From Congress)फालेरो यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

    गोव्यात (Goa)काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मोठे नेते असलेल्या लुईझिन्हो (Luizinho Faleiro Resigns From Congress)फालेरो यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.लुईझिन्हो फालेरो हे लवकरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस(Trinmool Congress) पक्षामध्ये प्रवेश करु शकतात. फालेरो यांनी यापूर्वी नुकतंच ममतांचं कौतुक देखीलं केलं होतं.

    राजीनाम्यानंतर आपल्या समर्थकांना संबोधित करताना फालेरो म्हणाले की, “मी काँग्रेसमध्ये त्रस्त होतो. मला गोव्याचा हा त्रास संपवायचा आहे. जर माझं दुःख इतकं असेल काँग्रेससाठी मतदान करणाऱ्या गोव्यातील नागरिकांच्या दुर्दशेची कल्पना करा.”

    “गोव्याचं हे दुःख लवकरात लवकर संपवूया. गोव्यात एक नवी पहाट आणूया. मी वयाने म्हातारा असू शकतो, पण माझं रक्त तरुण आहे”, असं लुईझिन्हो फालेरो म्हणाले. “मी नवेलीम विधानसभेच्या लोकांचे माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आभार मानतो आणि भविष्यातील सर्व प्रयत्नांमध्ये त्यांच्या निरंतर समर्थनाची अपेक्षा करतो”, असं ट्विट माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो-फालेरो यांनी केलं आहे.

    फालेरो यांनी ट्विटद्वारे ममता बॅनर्जींच कौतुक केलं आहे.“ ममता बॅनर्जी महिला सबलीकरणाच्या प्रतीक आहेत.  भाजपला त्यांनी थेट आव्हान दिलं आहे. त्या स्ट्रीट फायटर आहेत आणि गोवा राज्याला त्यांची गरज आहे.” असं ट्विट त्यांनी केलं आहे.