Mridula Sinha passes away

ऑगस्ट २०१४ पर्यंत त्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सदस्य होत्या. २०१४ च्या निवडणुकांच्या भाजपाच्या मोहिमेदरम्यान, त्या भाजपा महिला मोर्चाच्या (महिला शाखा) प्रभारी होत्या. २५ ऑगस्ट २०१४ रोजी गोवा राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली.

गोवा : गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे निधन ( Mridula Sinha passes away ) झाले. मृदुला सिन्हा (Former Goa Governor Mridula Sinha ) (२७ नोव्हेंबर १९४२ ते १८ नोव्हेंबर २०२०) एक भारतीय लेखक आणि राजकारणी होत्या. त्यांनी ऑगस्ट २०१४ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत गोवा राज्यपाल म्हणून काम केले होते. मृदुला सिन्हा यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९४२रोजी मिथिलामधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील छपरा धरमपूर यदु गावात झाला. त्यांनी सुरुवातील स्थानिक शाळेत आणि नंतर बालिका विद्यापीठात शिक्षण घेतले. लग्नानंतर मृदुला यांनी आपले शिक्षण चालू ठेवले आणि मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली.

ऑगस्ट २०१४ पर्यंत त्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सदस्य होत्या. २०१४ च्या निवडणुकांच्या भाजपाच्या मोहिमेदरम्यान, त्या भाजपा महिला मोर्चाच्या (महिला शाखा) प्रभारी होत्या. २५ ऑगस्ट २०१४ रोजी गोवा राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी राजदूत म्हणूनही सिन्हा यांची नियुक्ती केली होती. गोव्याचे राज्यपाल असताना त्यांनी दररोज पूजेच्या उद्देशाने एक गाय व वासराला राजभवनात दत्तक घेतले. स्व. मनोहर पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर आणि प्रमोद सावंत यांचे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळ्यांना पार पाडले.

मृदुला सिन्हा यांनि त्यांच्या वयाच्या ७८ व्या वर्षी, वाढदिवसाच्या केवळ १० दिवस आधी बुधवारी अखेरचा श्वास घेतला.