गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना जीवे मारण्याची धमकी, खंडणीची मागणी करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

मुख्यमंत्री प्रमोद महाजन यांना अज्ञात १ नोव्हेंबरपासून मेसेज करुन खंडणीची मागणी करत होता. सुरुवातीला याची गंभीर दखल घेतली नाही. परंतु त्याची दखल घेत त्यांनी पणजी पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली आहे.

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa Chief Minister Pramod Sawant) यांना मेसेज पाठवून खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची (death threats and demanded ransom) धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात पणजी पोलिस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना अज्ञात १ नोव्हेंबरपासून मेसेज करुन खंडणीची मागणी करत होता. सुरुवातीला याची गंभीर दखल घेतली नाही. परंतु त्याची दखल घेत त्यांनी पणजी पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे ओएसडी आत्माराम बर्वे यांनी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उशिरा पणजी पोलिस स्थानकाला मेल पाठवून याबाबत तक्रार केली.त्याच दिवशी म्हणजे ५ नोव्हेंबर रोजी त्यावर अज्ञाता विरोधात एफआयआर नोंदवून तपास सुरु करण्यात आला.आज या तक्रारीची माहिती लोकांसमोर आली.