गोव्यात भाजपमध्ये बंडाचे राजकारण, नाराज तीन मोठे नेते अपक्ष लढणार; फडणवीसांसमोर पेच

माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे मोठे नेते लक्ष्मीकांत पार्सेकर हे अपक्ष निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळतेय. ते मांद्रे विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून दंड थोपटणार आहेत. मांद्रेत विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. या जागेवर लक्ष्मीकांत पार्सेकरही इच्छुक होते. तर सांगे मतदारसंघातून सावित्री कवळेकर या अपक्ष निवडणूक लढणार आहेत. सावित्री कवळेकर या उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या पत्नी आहेत. भाजपनं चंद्रकांत कवळेकरांना केपे मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे.

    पणजी : गोवा भाजपाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (२० जानेवारी) पत्रकार परिषद घेत एकूण ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र, आपली पहिली उमेदवार यादी जाहीर होताच भाजपमध्ये बंडखोरीला सुरूवात झाली आहे. गोव्यातील भाजपचे तीन बडे नेते उमेदवारी न मिळाल्यानं आता अपक्ष म्हणून लढण्याच्या तयारीत आहेत.

    माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे मोठे नेते लक्ष्मीकांत पार्सेकर हे अपक्ष निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळतेय. ते मांद्रे विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून दंड थोपटणार आहेत. मांद्रेत विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. या जागेवर लक्ष्मीकांत पार्सेकरही इच्छुक होते. तर सांगे मतदारसंघातून सावित्री कवळेकर या अपक्ष निवडणूक लढणार आहेत. सावित्री कवळेकर या उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या पत्नी आहेत. भाजपनं चंद्रकांत कवळेकरांना केपे मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे.

    उत्पल पर्रीकर पणजीत जिंकून येऊ शकत नाहीत हे भाजपने आपल्या सर्वेक्षणातून शोधून काढले. गृहमंत्री अमित शहा यांनी यंत्रणा कामाला लावून त्या वास्तवावर मोहोर उमटवली. परंतु पर्रीकर असताना असा सर्व्हे केला असता तरीही तेच सत्य त्यांच्या हाती लागले असते. तेव्हा मात्र मनोहर पर्रीकरांना उमेदवारी नाकारण्याचे धैर्य भाजपला झाले असते का? पणजीत २३ टक्के कॅथलिक मतदार आहेत त्यांची काही मते पर्रीकरांना मिळत त्याचप्रमाणे २० टक्के सारस्वत मतांवरही त्यांची मदार असे. या मतदारसंघात बहुजन समाजाची आठ हजार मते आहेत. हे सर्व मतदार पर्रीकरांना अनुकूल होते का? तर नाही. पर्रीकरांनी मतदारांचा लोकानुनय कधी केला नाही परंतु आपल्या विरोधात बाबूश मोन्सेरात किंवा त्यांच्यासारखा आणखी प्रबळ उमेदवार उभा राहणार नाही, याची खबरदारी ते घेत असत.

    माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या समर्थकांची गुरुवारी सायंकाळी महत्त्वाची बैठक झाली. बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी पार्सेकर यांनी ही निवडणूक वेळप्रसंगी अपक्ष म्हणून लढवावी, असा आग्रह धरला. पक्षाने पार्सेकर यांच्यावर अन्याय केल्याची भावना कार्यकर्त्यांची झाली. ‘आपण येत्या तीन दिवसांत निर्णय घेणार आहे. तोपर्यंत भाजपच्या जाहीरनामा समिती अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे’, असे पार्सेकर यांनी सांगितले.