मायकल लोबोंची विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी; गोवा काँग्रेसमध्ये फूट

काँग्रेसमधले ९ विद्यमान आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी १० जुलै २०१९ ला कॉंग्रेसचे १० आमदार भाजपात (Bhartiya Janata Party) सामील झाले होते. तीन वर्षांनंतर याच घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांची विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे.

    पणजी : सध्या गोव्यातील राजकीय क्षेत्रात (Goa) घडामोडींना वेग आला आहे. कॉंग्रेसचे नेते मायकेल लोबो (Congress Leader Michael Lobo) यांची गोव्याच्या विरोधी पक्षनेतेपदावरून (Opposition Leader) उचलबांगडी करण्यात आली आहे. एआयसीसी (AICC) गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. काँग्रेस (Congress) फोडण्यासाठी किती पैसा फेकला हे मी सांगू शकत नाही, असा घणाघाती आरोपही दिनेश गुंडू राव यांनी भाजपवर (BJP) केला आहे.

    काँग्रेसमधले ९ विद्यमान आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी १० जुलै २०१९ ला कॉंग्रेसचे १० आमदार भाजपात (Bhartiya Janata Party) सामील झाले होते. तीन वर्षांनंतर याच घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांची विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे.

    दिनेश गुंडू राव म्हणाले की, आमच्या काही नेत्यांनी गोव्यातील काँग्रेस पक्ष कमकुवत करण्यासाठी आणि पक्षांतर करण्याचा प्रयत्न भाजपसोबत केला होता. या कटाचे नेतृत्व आमचेच दोन नेते एलओपी मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांनी केले. सध्या आमचे ५ आमदार येथे आहेत, आम्ही आणखी काही आमदारांच्या संपर्कात आहोत आणि ते आमच्यासोबत असतील असे त्यांनी सांगितलं. काँग्रेस पक्ष निराश होणार नाही, कमकुवत होणार नाही. हा मुद्दा आम्ही अधिक आक्रमकपणे मांडू, सत्तेसाठी आणि वैयक्तिक फायद्यासाठी दोन जणांनी केलेला हा विश्वासघात आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू असेही ते म्हणाले. गोव्यात काँग्रेसचे केवळ ११ आमदार आहेत. यापैकी ९ भाजपमध्ये गेल्यास काँग्रेसकडे केवळ दोनच आमदार राहणार आहेत.