लॉकडाऊन संपूनही गोवेकरांना राहावं लागणार घरात, सरकारकडून नवेे निर्बंध

गोव्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी नुकताच गोव्यात लॉकडाऊन लावण्यात आला होता. आता लॉकडाऊन संपला असला तरी कोरोना रुग्णांची संख्या पूर्णतः आटोक्यात आलेली नाही. आता पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय, अशी शक्यता गोव्यात दिसत होती. मात्र पुन्हा लॉकडाऊन न करता केवळ कडक निर्बंध लावण्याचा निर्णय गोवा सरकारनं घेतलाय. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती  दिलीय. 

    देशात लॉकडाऊनची दुसरी लाट धुमाकूळ घातलीय. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी गोव्यात कडक उपाययोजना केल्या जात आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत भौगोलिक दृष्ट्या छोटं  राज्य असलं तरी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गोवा सरकारनं कडक निर्बंध लागू केलेत.

    गोव्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी नुकताच गोव्यात लॉकडाऊन लावण्यात आला होता. आता लॉकडाऊन संपला असला तरी कोरोना रुग्णांची संख्या पूर्णतः आटोक्यात आलेली नाही. आता पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय, अशी शक्यता गोव्यात दिसत होती. मात्र पुन्हा लॉकडाऊन न करता केवळ कडक निर्बंध लावण्याचा निर्णय गोवा सरकारनं घेतलाय. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती  दिलीय.

    नव्या नियमावलीनुसार गोव्यात पुढील सोमवारपर्यंत कडक निर्बंध लागू असतील. या काळात कसिनो, शाळा आणि बाजारपेठा बंद असणार आहेत. याशिवाय इतरही अनेक निर्बंध लागू करण्यात आलेत.

    असे आहेत नवे निर्बंध

    • बाजारपेठा, शाळा, कसिनो पूर्ण बंद
    • मासळी बाजार संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू
    • बार बंद
    • रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेसह सुरू
    • धार्मिक स्थळे बंद
    • स्पा, सलून, सिनेमागृहे बंद
    • लग्नासाठी केवळ ५० जणांना उपस्थित राहता येणार
    • लग्नासाठीची परवानगी कलेक्टरकडून घ्यावी लागणार
    • राजकीय सभांसाठी मात्र निर्बंध नाहीत
    • नवे निर्बंध १० मे पर्यंत लागू राहणार