सावंत सलग दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. सोमवारी संध्याकाळी पणजीत भाजपचे नवनिर्वाचित आमदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सावंत यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यात आला.

    गोव्यात सोमवारी झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रमोद सावंत यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे सावंत सलग दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. सोमवारी संध्याकाळी पणजीत भाजपचे नवनिर्वाचित आमदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सावंत यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यात आला.