
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेनेच्या सभागृनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. परंतु ज्या पद्धतीची नोटीस (Notice) किंवा पत्र शिंदेंना दिलेलं आहे, ते आक्षेपार्ह असल्यामुळे त्याचं रीतसर उत्तर आम्ही पाठवू, त्या उत्तरानंतर त्यांनी ती कारवाई बदलली नाही, तर आम्ही आवश्यक ती कायदेशीर कारवाई करू शकतो, असा इशाराच शिंदे गटाच्या वतीने दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दिला आहे. गोव्यात आज केसरकरांनी पत्रकार परिषदे घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
पणजी : राज्यात नुकतेच सत्तांतर झाले आहे, महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजप व एकनाथ शिंदे बंडाळी गट (BJP and Shinde Group) यांचे सरकार आले आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची शपथ घेतली आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Vice CM Devendra fadnvis) यांनी पदभार स्विकारला आहे. राज्यात नवे सरकार येऊन दोन दिवस होतात न होतात तोच आता विधानसभा अध्यक्षाचे वेध लागले आहेत. दरम्यान, विधानसभा अध्यक्षाची निवड सुद्धा अटीतटीची होणार आहे, कारण महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी (Shivsena MLA Rajan Salvi) यांनी उमेदवारी देण्याती आली आहे, तर भाजपाकडून आणखी एक धक्का देत पहिल्यांदाच विधानसभेत पोहचलेले ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना विधानसभा अध्यक्षपदाची (Speaker of the Legislative Assembly election) उमेदवारी दिली आहे. तसेच शिवेसेनेनं एकनाथ शिंदेंना नेतेपदावरुवन काढल्यामुळं शिंदे गट आक्रमक झाल्या असून यावर त्यांच्या आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
दरम्यान, पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेनेच्या सभागृनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. परंतु ज्या पद्धतीची नोटीस (Notice) किंवा पत्र शिंदेंना दिलेलं आहे, ते आक्षेपार्ह असल्यामुळे त्याचं रीतसर उत्तर आम्ही पाठवू, त्या उत्तरानंतर त्यांनी ती कारवाई बदलली नाही, तर आम्ही आवश्यक ती कायदेशीर कारवाई करू शकतो, असा इशाराच शिंदे गटाच्या वतीने दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दिला आहे. गोव्यात आज केसरकरांनी पत्रकार परिषदे घेतली, त्यावेळी ते बोलत होते. (Press Conference MLA Deepak Kesarkar at Goa)
सभागृहाचे नेतेपद हे वैधानिक पद आहे. सभागृहाचे नेते हे सर्वोच्च पद आहे. सभागृहाचं कामकाज चांगलं चालावं, या दृष्टीनं या पदाची निर्मिती केली आहे. सभागृह नेते हे एका पक्षाचे नसतात, तर संपूर्ण सभागृहामध्ये जेवढे पक्ष आहेत, त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व ते सभागृहाचे नेते म्हणून करत असतात. शिवसेनेनं केलेली कृती त्यांच्याच पक्षाला शोभादायक नाही. एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून काढण्याचा प्रयत्न झाला तो चुकीचा आहे. अशी कृत्ये लोकशाहीसाठी शोभादायक नसल्याचंही दीपक केसरकरांनी म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. (Press Conference MLA Deepak Kesarkar at Goa)