डॉ. प्रमोद सावंतांनी घेतली दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, पंतप्रधान नरेंद्र मोदीही होते उपस्थित

प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळ्यासाठी भव्य स्टेज तयार करण्यात आला होता. त्यावर गोंय सरकार शपथविधी सुवाळो असं वाक्य लिहिलं होतं. या स्टेजच्या भोवती भव्य पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांचे फोटो होते.

    पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून आज डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी शपथ घेतली. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी प्रमोद सावंत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. प्रमोद सावंत यांच्यासह 8 मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अन्य 7 राज्यांचे मुख्यमंत्रीही या शपथविधी सोहळयाला उपस्थित होते.

    आज सकाळी 11 वाजता प्रमोद सावंत यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासह आठ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनी सर्व मंत्र्यांचे अभिनंदन केले.

    प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळ्यासाठी भव्य स्टेज तयार करण्यात आला होता. त्यावर गोंय सरकार शपथविधी सुवाळो असं वाक्य लिहिलं होतं. या स्टेजच्या भोवती भव्य पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांचे फोटो होते. शपथविधी सोहळ्यापूर्वी डॉ. प्रमोद सावंत यांनी घरात पूजा अर्चा केली. प्रमोद सावंत यांनी मनोभावे कुलदैवतेला साकडे घातले. त्यानंतर ते शपथविधीसाठी घराबाहेर पडले.