श्रीपाद नाईकांची प्रकृती स्थिर, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली ही माहिती

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. इतर कुठलाही त्रास त्यांना होत नसून लवकरात लवकर ते बरे होतील, असं गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितलंय. सोमवारी रात्री त्यांच्यावर दोन किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहितीदेखील गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलीय.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीचा धोका टळला असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलीय. सोमवारी कर्नाटकमध्ये झालेल्या अपघातात श्रीपाद नाईक गंभीर जखमी झाले होते, तर त्यांच्या पत्नीचा या अपघातात मृत्यू झाला.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. इतर कुठलाही त्रास त्यांना होत नसून लवकरात लवकर ते बरे होतील, असं गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितलंय. सोमवारी रात्री त्यांच्यावर दोन किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहितीदेखील गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलीय.

उत्तर कर्नाटकात प्रवास करीत असताना अंकोला तालुक्यातील होसाकांबी गावाजवळ एका वळणावर त्यांची गाडी पलटली. हे सर्वजण यल्लापूर ते गोकर्ण असा प्रवास करीत होते. या अपघातात विजया नाईक या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर त्यांच्या गाडीत असलेल्या तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे., यात श्रीपाद नाईक यांचाही समावेश आहे.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले श्रीपाद नाईक हे भारतीय जनता पार्टीचे महत्त्वाचे नेते आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही त्यांचा संबंध आहे. दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर, गोव्यातील भाजपाचे प्रमुख नेते अशी श्रीपाद यांची ओळख आहे.