Indian Air Force Day 2020 the pride and glory of the Air Force

नियमित उड्डाणादरम्यान मिग-29 के मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर वैमानिकाने विमानातून उडी मारून त्याचा जीव वाचवला.

    गोवा : गोव्यातुन एक मोठी बातमी समोर येत याहे. गोव्याच्या समुद्रात MiG-29K क्रॅश झाल्याची (Plane Crashed)  माहिती समोर आहे. नियमित उड्डाणादरम्यान ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार, सध्या वैमानिकाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची संबधित अधिकाऱ्यांनी दखल घेतली असुन घटनेच्या कारणाचा तपास करण्याचे आदेश बोर्ड ऑफ इन्क्वायरी (बीओआय) ला देण्यात आले आहेत.