गोवा आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाची आज घोषणा होणार, प्रमोद सावंत मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?

गोवा व उत्तराखंडच्या नव्या मुख्यमंत्र्यांची आज घोषणा होणार असल्याची शक्यता आहे. काल, रविवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. आज दोन्ही राज्यातील नवनिर्वाचित भाजप आमदारांद्वारे आपापल्या विधीमंडळ पक्षांच्या नेत्यांची निवड केल्यानंतर मुख्यमंत्री पदाची घोषणा केली जाईल.

    पणजी : देशात पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपाने चार राज्यात मुसंडी मारली आहे. त्यामुळं यूपीत २५ तारखेला आदित्यनाथ योगी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, तर  गोवा व उत्तराखंडच्या नव्या मुख्यमंत्र्यांची आज घोषणा होणार असल्याची शक्यता आहे. काल, रविवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. आज दोन्ही राज्यातील नवनिर्वाचित भाजप आमदारांद्वारे आपापल्या विधीमंडळ पक्षांच्या नेत्यांची निवड केल्यानंतर मुख्यमंत्री पदाची घोषणा केली जाईल.

    दरम्यान, आज संध्याकाळी ४ वाजता प्रदेश भाजप कार्यालयात भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे. आमदारांचा गट ज्या नेत्याला निवडतील, तो सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपला पी एस श्रीधरन पिल्लई यांना संपर्क साधतील. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये सरकार स्थापन करण्याबाबत हालचाल सुरू असताना गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तनवडे म्हणाले की, ‘केंद्रीय पर्यवेक्षक, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री एल मुरुगन आज, सोमवारी गोव्यात येणार आहेत.

    आज गोवा तसेच उत्तराखंड या राज्यातील मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा केली जाणार आहे, त्यामुळं आज याकडे लक्ष लागले आहे. दोन्ही राज्यात मुख्यमंत्री शपथविधीचा सोहळा या आठवड्यात आयोजित करण्याची शक्यता आहे. यूपीत २५ तारखेला आदित्यनाथ योगी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर बाकीच्या राज्यातील मुख्यमंत्री कोणार होणार याकडे नजरा लागल्या आहेत.