राज्यात ३० टक्के अल्पसंख्यंक बीफचे सेवन करतात. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्यांचाही विचार करणे हेही आपले कर्तव्य असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पणजी: कर्नाटकने केलेल्या गोहत्याबंदी विधेयकाचा परिणाम गोव्यावर होत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे राज्यात गोमांसाचा (बीफ) तुटवडा भासत आहे. गायीला आपणदेखील माता मानतो, पण राज्यात ३० टक्के अल्पसंख्यंक बीफचे सेवन करतात. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्यांचाही विचार करणे हेही आपले कर्तव्य असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

भाजपाची दुटप्पी भूमिका नाही
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बीफच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. बीफवरून भाजपा दुहेरी भूमिका घेत आहे अशी टीका होत असतानाच मुख्यमत्री म्हणाले की, राज्यातील जनतेचा विचार करणे हेच मुख्यमंत्र्यांचे काम आहे. बीफवरून आम्ही कोणतीही दुटप्पी भूमिका घेतली नाही. संबंधित यंत्रणांना बीफचा तुटवडा भासणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबत निर्देश दिले असल्याचे ते म्हणाले.