प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोना संसर्गामुळे शासनाकडून करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनमुळे मच्छीमार समाजाच्या व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने त्वरित योग्य ते स्पष्ट आदेश जारी करून मच्छीमार समाजाला दिवसातून दोन वेळा मत्स्य विक्रीची परवानगी द्यावी ...

    गोंदिया (Gondia).  कोरोना संसर्गामुळे शासनाकडून करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनमुळे मच्छीमार समाजाच्या व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने त्वरित योग्य ते स्पष्ट आदेश जारी करून मच्छीमार समाजाला दिवसातून दोन वेळा मत्स्य विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी मत्स्य व्यवसायिकांनी केली आहे.

    शासनाच्या आदेशानुसार मत्स्य खरेदी-विक्री, वाहतूक करण्याची परवानगी आहे. मत्स्य विक्री सकाळी 7 ते 11 वाजतापर्यंत असा नियम आहे. मासेमारीचा केवळ 40 दिवसांचा हंगाम शिल्लक आहे. त्यानंतर 61 दिवस मासेमारी बंद राहणार आहे. अशावेळी संचारबंदीच्या काळात मत्स्य विक्री झाली नाही तर मासेमारी नौकांवर काम करणारे तांडेल, खलाशी यांचा दैनंदिन मेहनताना देणार कुठून, डिझेल, बर्फ आदी सामग्रीसाठी खर्च करणार कुठून, अशा अनेक आर्थिक संकटांत मच्छीमार व त्यावर अवलंबून असलेला मच्छीमार समाज अडचणीत आहे.

    त्यासाठी किरकोळ व होलसेल मत्स्य विक्री बाजार तसेच बंदरांवर, जेटींवर पहाटे पाच ते दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजतापर्यंत अशा दोन सत्रात मासळी विक्री सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. तसेच नागरिकांना मार्केटमध्ये येण्या-जाण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी मत्स्य व्यवसायिकांनी केली आहे.