देवरी तालुक्याच्या जंगलात वनवाच वनवा; मोहफुलाच्या नादात जंगलात वणव्यांची मालिका सुरू

देवरी तालुक्यातील वनपरिक्षेत्रातील जंगले जळून खाक होत आहेत. सध्या जंगलात वनव्यांची मालिका सुरू झाली आहे. जंगल जळत असताना त्यांच्या जवळ असणारे खासगी वनक्षेत्र मात्र सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वनखात्याच्या जंगलात लागणाऱ्या वणव्यांमागे संशयाचा धूर असल्याची तालुक्यात चर्चा आहे.

    देवरी (Deori).  तालुक्यातील वनपरिक्षेत्रातील जंगले जळून खाक होत आहेत. सध्या जंगलात वनव्यांची मालिका सुरू झाली आहे. जंगल जळत असताना त्यांच्या जवळ असणारे खासगी वनक्षेत्र मात्र सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वनखात्याच्या जंगलात लागणाऱ्या वणव्यांमागे संशयाचा धूर असल्याची तालुक्यात चर्चा आहे.

    एकदा उन्हाळा सुरू झाला की, तालुक्यातील जंगलात वणवे लागायला सुरुवात होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. यामागील नेमके प्रकरण काय आहे, ते अद्यापही उजेडात आले नसले तरी मोहफुलांसाठी लोकांनी लावलेला वणवा असावा असेही बोलले जात आहे. तालुक्यात खासगी वनक्षेत्र असताना नेमकी वनखात्याच्या जंगलांमध्येच वणवे कसे लागतात, याचे रहस्य आजपर्यंत उलगडले नाही. वनखात्यामार्फत पावसाळ्यात वनजमिनीवर मोठ्या प्रमाणात रोपांची लागवड केली जाते.

    खड्डे खोदणे, रोपांची देखभाल करणे, त्यांना पाणी देण्यासाठी मजूर, ट्रॅक्टरची व्यवस्था करणे, वणवे लागू नयेत किंवा या रोपांचे जनावरे, मनुष्य यांनी नुकसान करू नये म्हणून वनव्यवस्थापन समितीच्यावतीने तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षारक्षक नेमणे, या सर्व बाबींवर प्रत्येक वनपरिक्षेत्रात दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. उंच टेकड्या, डोंगराळ, दुर्गम भागातील जंगलात हा उपक्रम राबविला जातो. तो नेमका कशा प्रकारे राबविला जातो याची कुठेही प्रसिद्धी होत नसली तरी उन्हाळ्यात तालुक्यात अनेक ठिकाणी वणवे लागतात कसे? असा ही प्रश्न वनविभातच उद्भवायला लागला आहे.

    यावर्षीही देवरी तालुक्यातील अनेक जंगले जळू लागली आहेत. मोहफुलासाठी लहानसी लागलेली आगीची ठिणगी वणव्यात तर रुपांतर नाही होत ना? व त्यामुळेच तर वणवा लागत नाही ना? असाही विषय वनविभात रंगू लागला आहे. तालुक्या अनेक ग्रामीण भागात वणवा लागला असताना या परिसरात एकही वन कर्मचारी, अधिकारी फिरकत नाही असेही त्या परिसरातील लोकांचे बोलने आहे. परिणामी, हे सर्व जंगल जळून खाक होतात व तालुक्याच्या या जंगलात असलेल्या अनेक दुर्मिळ वनौषधी, पशुपक्ष्यांचा वावर जळून खाक होतात, तर अनेक मुके प्राणी शहराकडे धाव घेतात. त्यामुळे वनविभाने याकडे गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.