corona death

गोंदिया. काल प्राप्त अहवालातून जिल्ह्यात चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा (four corona positive died) मृत्यू झाला . ८० जणांना कोरोनाची बाधा झाली असून ८३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ४९ रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी ४ रुग्ण हे बाहेर जिल्हा किंवा राज्यातील  आहे. काल रात्री गोंदिया येथील टीबी टोलीतील ७३ वर्षीय रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल गोंदिया तालुक्‍यातील अंभोरा येथील 60 वर्षीय रुग्णाचा, गोंदियाच्या सेल टॅक्स कॉलोनी येथील ४३ वर्षीय महिला रुग्णाचा आणि अर्जुनी मोरगाव येथीळ ७० वर्षीय रुग्णाचा मधुमेहाचा त्रास असल्याने मृत्यू झाला. जिल्हयात आतापर्यंत प्रयोगशाळा चाचणीतून २१८९ नमुने आणि रॅपेड अँटिजेन चाचणीतून ११३४ नमुने असे एकूण ३३२३ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.

काल  ८० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. यात गोंदिया तालुक्‍यात सर्वाधिक ३८ रुग्ण आढळले आहे. यामध्ये आझाद वॉर्ड, बाजपेयी चौक, गौरीनगर,गौशाला वॉर्ड, गुरूनानक वार्ड, गोविंदपूर, मनोहर चौक,मुरी, मामा चौक, पुनाटोली ,रिंग  रोड,सुरजमल  कॉलनी, सेल टॅक्स कॉलनी व शारदा कॉलनी तेथील प्रत्येक रुग्ण, गोंदिया शहरातील इतर भागातील दोन रुग्ण, गंजवार्ड, मरारटोली येथी प्रत्येकी दोन रुग्ण, गांधी प्रतिमा व बजाजनगर येथील प्रत्येकी तीन रुग्ण, कन्हारटोली येथील चार रुग्ण व गणेशनगर येथील पाच रुग्णांचा समावेश आहे.