घर बांधकामाला महागाईचा फटका; नवीन घराचे स्वप्न अपूर्णच

सुविधायुक्त घर असावे, अशी अनेकांची इच्छा असते. परंतु, सध्या नवीन घराचे बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे भाव गगनाला भिडल्याने अनेकांचे नवीन घराचे स्वप्न आजच्या घडीला महागाईच्या विळख्यात सापडले आहे.

    गोंदिया (Gondia).  सुविधायुक्त घर असावे, अशी अनेकांची इच्छा असते. परंतु, सध्या नवीन घराचे बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे भाव गगनाला भिडल्याने अनेकांचे नवीन घराचे स्वप्न आजच्या घडीला महागाईच्या विळख्यात सापडले आहे.

    आधीच बांधकामाचे साहित्याचे वाढलेले भाव आता त्यात इंधन दरवाढीची भर पडली आहे. कारण इंधनाचे दर वाढल्याने वाहतुकीचा खर्च पण वाढला आहे. पर्यायाने बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाली. वाढत्या दराने बांधकाम व्यावसायिकांवर मंदीचे ढग कोसळल्याचे दिसून येत आहे. इंधन दरवाढीने सर्व क्षेत्रात महामागाईने डोकेवर काढले आहे. मुद्रांक शुल्क कमी केलेला असला तरी बांधकाम साहित्य महागल्याने बांधकाम करणे अडचणीत आले आहे.