अवैध दारू विक्रेत्यावर धाड; १७ हजारांचा मुद्देमाल जप्त

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबेटेकडी येथील अवैध दारू विक्रेत्यावर उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या नेतृत्वात भरारी पथकाने धाड टाकून 17 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

    अर्जुनी मोरगाव (Arjuni Morgaon).  तालुक्यातील धाबेटेकडी येथील अवैध दारू विक्रेत्यावर उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या नेतृत्वात भरारी पथकाने धाड टाकून 17 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी सुभाष धनीराम डोंगरवार (40)विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.

    सविस्तर माहितीनुसार धाबेटकडी येथे गुप्त माहितीच्या आधारावर गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या गोपनीय माहितीनुसार देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात अर्जुनी मोरगावचे ठाणेदार महादेव तोंदले, पोलीस शिपाई रवींद्र गावराने यांनी धाबेटेकडी येथील अवैध दारू विक्रेता सुभाष धनीराम डोंगरवार याच्या घरी धाड टाकली.

    आरोपीच्या घरातील धाब्यावर प्लास्टिक पोत्यात 90 मिली देशी दारूचे 200 नग किंमत पाच हजार दोनशे रुपये, 90 एमयलने भरलेले 400 सीलबंद देशी दारूच्या चार पेट्या किंमत दहा हजार चारशे रुपये, तसेच 180 एमएलने भरलेले ऑफिसर चॉईस ब्ल्यूचे अकरा नग किंमत पंधराशे 40 रुपये असा एकूण 17 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस शिपाई रवी गावराने यांच्या तक्रारीवरून आरोपी सुभाष डोंगरवार विरोधात भांदवीच्या कलम 56 ई,77अ, 83 मदाका अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार महादेव तोदले यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक ज्ञानेश्वर बोरकर करत आहेत.