अपर पोलिस अधीक्षक कुळकर्णी यांचे स्थानांतर; चाहत्यांत नाराजीचे वातावरण

अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुळकर्णी यांचे चंद्रपूर येथे स्थानांतर करण्यात आले. राज्य शासनाच्या गृहविभागाने अतुल कुळकर्णी यांच्या स्थानांतराचे आदेश जारी केले असून तशी कारवाई करण्याच्या सूचना पोलिस महासंचालकांना केल्या आहेत.

    गोंदिया (Gondia).  अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुळकर्णी यांचे चंद्रपूर येथे स्थानांतर करण्यात आले. राज्य शासनाच्या गृहविभागाने अतुल कुळकर्णी यांच्या स्थानांतराचे आदेश जारी केले असून तशी कारवाई करण्याच्या सूचना पोलिस महासंचालकांना केल्या आहेत.

    अतुल कुळकर्णी सध्या जिल्ह्यातील देवरी पोलिस उपमुख्यालयाचा कारभार सांभाळत होते. कुळकर्णी यांचा कार्यकाळ एकंदरीत जिल्ह्यात उत्तम राहिला. असून त्यांनी नक्षल चळवळीवर चांगले नियंत्रण मिळविले होते. त्यासह अनेक मोठ्या गुन्ह्यांत कारवाई केली होती. मोठ्या गुन्ह्यांचा तपास वेगात होऊन आरोपींना शिक्षा होण्यास मदत झाली होती. त्यांच्या कार्यकाळात कोरोनावर घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे अतिशय चांगले काम झाले. प्रशासनावर पकड आणि गुन्हेगारांत दहशत असे त्यांचे काम होते. ऐन कोरोनाच्या संकटात त्यांचे स्थानांतर झाल्याने त्यांच्या चाहत्यांत नाराजीचे वातावरण आहे.