प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

भारतात सध्या कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा (The third phase of corona vaccination) सुरु आहे. सध्या देशात कोविशील्ड, कोवॅक्सिन आणि स्पुतनिक वी (Covishield, Covacin and Sputnik V) या लसींद्वारे लसीकरण करण्यात येत आहे. गोंदियात 62 वर्षीय महिलेनं एकाच दिवशी कोविशिल्डचे दोन डोस दिल्याचा आरोप केला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस (the second dose) दहा मिनिटांच्या अंतरानं देण्यात आला, असं वृद्ध महिलेनं सांगितलं.

  गोंदिया (Gondia).  भारतात सध्या कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा (The third phase of corona vaccination) सुरु आहे. सध्या देशात कोविशील्ड, कोवॅक्सिन आणि स्पुतनिक वी (Covishield, Covacin and Sputnik V) या लसींद्वारे लसीकरण करण्यात येत आहे. गोंदियात 62 वर्षीय महिलेनं एकाच दिवशी कोविशिल्डचे दोन डोस दिल्याचा आरोप केला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस (the second dose) दहा मिनिटांच्या अंतरानं देण्यात आला, असं वृद्ध महिलेनं सांगितलं. मात्र. आरोग्य अधिकाऱ्यांनी महिलेनं दिलेली माहिती चुकीची असल्याचा खुलासा केला आहे. (Health officials have revealed that the information provided by the woman was incorrect)

  नेमकं काय घडलं?
  एकाच दिवशी कोरोनाच्या लसीचे दोन डोस दिल्याचा आरोप महिलेनं केला आहे.एकीकडे कोरोना रोखण्यात रामबाण समजले जाणारे कोविशील्डचा तुटवडा असताना एका 62 वर्षीय महिलेला पहिलाच डोस 10 मिनिटांच्या अंतराने दोनदा देण्यात आल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात येत असलेल्या गिधाडी येथील लसीकरण केंद्रावर घडल्याचा दावा करण्यात आल्यानं एकच खळबळ माजली आहे. महिलेनं केलेल्या आरोपाने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली आहे. अनुसया केवलचंद पारधी (वय 62) असे त्या महिलेचे नाव असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

  कुठे प्रकार घडला?
  गोरेगाव तालुक्यातील गिधाडी येथील अनुसयाबा केवलचंद पारधी(वय 62) या ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य असून त्यांनी कोविशील्ड इंजेक्शनचा पहिला डोस घेण्याकरिता गावातीलच शाळेत पोहोचल्या. केंद्रावर उपस्थित आरोग्य सेविकेने त्यांना पहिला डोस दिला त्यांना काही वेळ तिथेच थांबण्यास सांगण्यात आले. मात्र, 10 मिनिटाने त्याच महिलेचे नाव घेऊन त्यांना पुन्हा बोलवण्यात आले. दुसरा डोस देखील देण्यात आला. महिलेने घरी जाऊन हा सर्व प्रकार मुलगा विनोद पारधी यांना सांगतिला. विनोद पारधी यानं दोन इंजेक्शन दिल्याचे घाव दिसून आल्याचा दावा केला आहे. सध्या त्या महिलेची प्रकृती स्थिर आहे.

  जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं मत काय?
  जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे या प्रकरणाबाबत विचारणा केली असताना या महिलेचा दोनदा लस देण्यात आली नाही. आम्ही याची संपूर्ण माहिती घेतली असून ही अफवा आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन कापसे यांनी यांनी दिली आहे.