गुजरातच्या मतदारांनी एमआयएमचा पतंग कापला; सर्व उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त

आज निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर एआयएमआयएम पक्षाच्या उमेदवारांच्या डिपॉझिट देखील जप्त झाले आहे. एमआयएमचा पतंग गुजरातमध्ये चालू शकला नाही. त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.

    मुंबई – गुजरात विधानसभा (Gujarat Assembly Election) निवडणुकीत तिरंगी लढाई पाहायला मिळाली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP), काँग्रेस (Congress) आणि आप (AAP) यांच्यात चुरस दिसून आली. मात्र, निकाल एकतर्फी लागताना दिसत आहे. या निवडणुकीत ओवेसी यांच्या एआयएमआयएम (AIMIM) पक्षाने १३ उमेदवारांसह निवडणूक लढवली, त्यापैकी २ उमेदवार हिंदू होते.

    आज निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर एआयएमआयएम पक्षाच्या उमेदवारांच्या डिपॉझिट देखील जप्त (Deposit Forfeiture) झाले आहे. एमआयएमचा पतंग गुजरातमध्ये चालू शकला नाही. त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.

    मांडवी जागेवर वकील मोहम्मद इक्बाल मंजालिया, भुज जागेवर सकील मोहम्मद, सुरत पूर्व जागेवर वसीम इक्बाल खोकर, खंभलिया जागेवर बुखारी याकुब मोहम्मद, मंगरूळ जागेवर सुलेमान पटेल, लिंबायत जागेवर अब्दुल बशीर शेख, गोध्रा जागेवर हसन शब्बीर कचबा, वेजलपूर जागेवर झैनाब शेख, दर्यापूर मतदारसंघातून हसन खान समशेरखान पठाण, जमालपूर-खाडिया मतदारसंघातून साबीर काबलीवाला, दानीलिमडा मतदारसंघातून कौशिकाबेन परमार, वडगाम (एससी) जागेवर कल्पेश सुधिया आणि सिद्धपूर मतदारसंघातून अब्बास मोहम्मद शरीफ नोडसोला यांना तिकीट देण्यात आले होते.

    मुस्लीम मतदारांमध्ये नाराजी
    एआयएमआयएमने प्रथमच संपूर्ण तयारीसह १४ जागांवर उमेदवार उभे केले. यात दोन हिंदू आणि १२ मुस्लिमांना तिकीट दिले होते. एआयएमआयएमच्या प्रवेशाने या सर्व जागांची समीकरणे उलटू शकली असती, पण गोध्रापाठोपाठ अहमदाबादमध्येही ओवेसींच्या पक्ष एआयएमआयएमविरोधात मुस्लिम मतदारांमध्ये नाराजी दिसून आली. गेल्या वर्षी झालेल्या गोध्रा नगरपालिका निवडणुकीत एआयएमआयएमने सात जागा जिंकल्या आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अपक्षांशी युती केली हे त्यामागचे कारण होते.